भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ambarnathसाहित्य

प्रा. किसन वराडे लिखित “देणे प्रतिभेचे” या गझल संग्रहाचे उत्साहात प्रकाशन

अंबरनाथ,मंडे टु मंडे न्युज | नुकतेच प्रा.किसन वराडे लिखित “देणे प्रतिभेचे” या गझलसंग्रहाचे अंबरनाथ येथे प्रकाशन झाले. बाजीगर प्रकाशनाने प्रकाशित केलेला प्रा.किसन वराडे लिखित देणे प्रतिभेचे गझलसंग्रह सर्वांनी वाचावा असाच आहे. या गझल संग्रहाला प्रस्तावना डॉ.अविनाश सांगोलेकर यांची लाभलेली असून गझल संग्रहाची पाठराखण विजय जोशी सरांची आहे. अतिशय सुंदर असा हा गझलसंग्रह रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात तिळमात्र शंका नाही. सामाजिक विषय, वास्तविकता, जेआपण जगलो ते सर्व चित्रण या गझल संग्रहातून अनुभवता येते. मग ते वेदनेचे असो की सुखाचे असो.

या सुंदर अशा पुस्तकाचे मुखपृष्ठ कु.अक्षरा पाटील हिने तयार केले, पुस्तकाचे मुखपृष्ठ मनाचा ठाव घेते इतके बोलके तिने ते साकारले आहे. या सुंदर अशा प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून प्रा.डाॅ.अविनाश सांगोलेकर(आद्य मराठी गझल संशोधक), उद्घाटक प्रा.गुणवंत भंगाळे (शिक्षण तज्ञ), विशेष अतिथी सुप्रसिद्ध कवी अरूण म्हात्रे, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर, प्रा.संध्या महाजन (साहित्यिका), सुप्रसिद्ध कवी गझलकार विजय जोशी, ज्येष्ठ गजलकार प्रकाशक सिराज शिकलगार होते.

कार्यक्रमात सुरवातीला मनिषा कोल्हे यांनी ‘माही माय सरसोती’ ही बहिणाबाईंची कविता सादर केली. तर स्वागत गीतावर कु.प्रचिती वराडे हिने नृत्य सादर केले. प्रास्ताविक विवेक वराडे यांनी केले. प्रकाशन सोहळ्याचे आभार प्रदर्शन डॉ.जयेश वराडे यांनी केले. राज्यभरातील साहित्य रसिकांनीआपली हजेरी या सोहळ्यास लावली होती.

या सुंदरअशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे व दिपाली कात्रे यांनी केले. गझलकार किसन वराडे यांनी त्यांची पत्नी प्रतिभा वराडे यांना हा गझलसंग्रह अर्पण केलेला आहे. कार्यक्रमाध्यक्ष श्री.अविनाश सांगोलेकर यांनी हा गझलसंग्रह आवर्जून वाचावा, अनुभववावा असे उपस्थितांना आवाहन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!