किनगाव घटनेतील दोषींना तातडीने तडीपार करा, काही समाजकंटकांचा पुन्हा एकदा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न -किरीट सोमय्या यांचा असा गंभीर आरोप
जळगाव. मंडे टु मंडे न्युज ||जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनादरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी “किनगाव येथील घटनेतील दोषींना तातडीने तडीपार करण्याचे आदेश द्यावेत” अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली आहे।
किरीट सोमय्यांचे आरोप…. किनगाव येथील घटनेतील दोषींना तातडीने तडीपार करा.
किनगाव येथे झालेली दगडफेक अत्यंत दुर्दैवी आहे. काही समाजकंटक पुन्हा एकदा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. या घटनेत जे कोणी दोषी आढळतील, त्यांना तातडीने जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे. अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. या संदर्भात किरीट सोमय्या स्वतः किनगाव व यावल परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
काय आहे किनगाव दगडफेक प्रकरण?
ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दसऱ्यानिमित्त आयोजित पथसंचलनाच्या मार्गावरून दोन गटांत वाद निर्माण झाला. एका धार्मिक स्थळाजवळून जाणाऱ्या मार्गाला विरोध दर्शवल्यानंतर तणाव वाढला.
पोलिसांवर दगडफेक: परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आणि पथसंचलनावर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत एक पोलीस उपनिरीक्षक आणि ४ ते ५ कर्मचाऱ्यांसह सुमारे ७ जण जखमी झाले.
परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात १०० हून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी आतापर्यंत १६ संशयित आरोपींना अटक केली आहे, ज्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या किनगावात राज्य राखीव पोलीस दल (SRPF), आरसीबी आणि स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणि शांततेत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

