जळगाव जिल्ह्यातील पाच सहा. पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, निंभोरा येथे मिरा देशमुख तर नशिराबाद येथे योगिता नारखेडे
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ५ सहाय्यक पोलीस उप निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.
वाहतुक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांची नशिराबाद पोलिस स्टेशनला प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी
निंभोरा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. हरीदास बोचरे यांची वाहतूक शाखेत करण्यात आली असून त्यांचे जागी रावेर येथील स.पो.नि. मिरा देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे. आता निंभोरा पोलिस स्टेशन ला
स.पो.नि. मिरा देशमुख ह्या असतील. तर वाहतुक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांची नशिराबाद पोलिस स्टेशनला प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. कासोदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात रीडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निलेश राजपूत यांच्या जागी रीडर श्रीकांत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

