रावेर तालुक्यातील गट, गण, रचना जाहीर , ६ गट ,१२ गण,निवडणुकीचे पडधाम वाजायला सुरुवात
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून गट आणि गण रचनेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रावेर तालुक्यात ६ गट त्यात वाघोळ,केऱ्हाळे निंभोरा,चिनावल, वाघोदा ,ऐनपूर,आणि १२ गण निश्चित करण्यात आले असून प्रत्येक गटात चुरशीच्या लढती होणार असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून तालुक्यात सर्वत्र राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार अमोल जावळे यांच्या साठी ही पहिलीच निवडणूक असून ती महत्त्वाची असणार आहे.
१३ )वाघोळ गट
वाघोड गण – पाडळे, निरुळ, कर्जोत, खानापुर, अजनाड, चोरवड, अट वाडेवाघोड या गावांचा समावेश आहे. खिरवड गणात – भोकरी, तामसवाडी, बोरखेडा, दोन्ही, मोरगाव, दोघे, नेहेते, खिरवड, पुनखेडा, पातोंडी, थेरोळे, धुरखेडा, निंभोरासीम या गावांचा समावेश आहे.
१२ ) केऱ्हाळे गट
रसलपूर गण – पाल,जिन्सि, गुलाबवाडी, मोरव्हाल, रसलपूर, खिरोदा प्र रावेर, मुंजलवाडी या गावांचा समावेश आहे. के-हाळे बु गण – रमजीपूर, मंगरुळ, आभोडा, अहिरवाडी, पिंप्री, के-हाळे, बक्षीपुर, रसलपुर, खिरोदा प्र रावेर, मोहगण बुद्रुक पिंप्री या गावांचा समावेश आहे.
१४ )निंभोरा गट –
निंभोरा बु. गण
निंभोरा बुद्रुक, वडगाव, अजंदे, भोर, नांदुरखेडे, निबोल, विटवे, सांगवे या गावांचा समावेश आहे. विवरे बु. गणात
सहस्रलिंग, दोन्ही विवरे, लालमाती, दोन्ही कुसुंबा, शिंदखेडा, उटखेडे, भाटखेडे या गावांचा समावेश आहे.
१५)चिनावल गट
खिरोदा प्र यावल गण
गारखेडे, निमड्या, गारबर्डी, मोहमांडली नवी, तिड्या, अंधारमळी, लोहारा, चिचाटी, गौलखेडा, सावखेडे बुद्रुक, खिरोदा प्र यावल या गावांचा समावेश आहे. चिनावल गणात कुंभारखेडा, रझोदा, कळमोदे, सावखेडेखुर्द गावांचा समावेश आहे.
१६ )वाघोदा बु –गट
वाघोदा बु गण
दोन्ही कोचूर, मस्कावद सीम, मस्कावद खुर्द, बोरखेडे सीम, दसनूर, सिंगनूर, वाघोदा बु गावांचा समावेश आहे. थोरगव्हाण गणात मस्कावद बुदुक, सुनोदे, गाते, वाघोदे खुर्द, थोरगव्हाण, मांगी, चुनवडे, सुदगाव, रायपुर, गहुखेडे, रंगगाव, तासखेडे, लुमखेडा दोन्ही उदळी गावांचा समावेश आहे.
१७)ऐनपूर –गट
ऐनपुर गण ऐनपुर, रेंभोटे, दोन्ही खिर्डी, सुलवाडी, वाघाडी गावांचा समावेश आहे. तांदलवाडी गण
शिंगाडी, भामलवाडी, कोळोदे, धामोडी, कांडवेल, पुरी, गोलवडे, बलवाडी, सिंगत, तांलदवाडी मांगलवाडी आंदलवाडी या गावांचा समावेश आहे.


