भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

मध्यप्रदेशच्या धर्तीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी – आ.अमोल जावळे यांची विधिमंडळात मागणी

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमोलभाऊ जावळे यांनी अतिवृष्टी व वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या शेती नुकसानीसंदर्भात अतिशय महत्त्वाचा मुद्दा सभागृहात मांडला. सध्या महाराष्ट्रात शेती नुकसान भरपाई मिळण्यासाठी साधारण वर्षभराची प्रतीक्षा करावी लागते, तर मध्यप्रदेशमध्ये अवघ्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर अर्धी नुकसानभरपाई जमा केली जाते. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही नुकसान नोंदणी प्रक्रियेत गती येऊन तातडीने मध्यप्रदेशच्या धर्तीवर भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार जावळे यांनी अधिवेशनात केली.

त्याचप्रमाणे, रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील काही गावांमध्ये मागील महिन्यात आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत, ही बाबही त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिली. शेतकरी १५ दिवसांपासून प्रतिक्षेत असून, त्यांना पुढील पेरणीचे नियोजन करायचे असल्याने पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२९ जून रोजी चिनावल, उटखेडा, रसलपूर या भागांमध्ये जिओ टॅगिंग व व्हेरिफिकेशन प्रक्रियेची अंमलबजावणीही वेळेवर झालेली नाही, याकडेही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

“शेतकरी संकटात असताना त्यांना वेळेवर मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे, त्यामुळे पंचनामे व नुकसान भरपाई प्रक्रियेला अधिक गतिमान करावे,” अशी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी ठाम भूमिका मांडली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!