लाडकी बहिण योजने मुळे सरकारच्या तिजोरीवर ताण, ही योजना बंद होणार? काय म्हणाल्या मिसेस मुख्यमंत्री….
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात चर्चा होत असताना लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण निर्माण झाला असून त्यामुळे विकास निधी उशिरा मिळतो आहे, असे विधान राज्यातील मंत्री दत्ता भरणे यांनी केले. याच मुद्द्यावर छगन भुजबळ यांनीही योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याचे कबूल केले आहे. आता याच विषयावर अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य केले असून, त्यांचे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे
पुण्यात एका कार्यक्रमा मध्ये अमृता फडणवीस यांच्या हस्ते लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले.
‘लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत आहे. पण ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकार आर्थिक ताण सहन करायला तयार आहे. मध्यंतरी काहीतरी फिल्टरेशन करावे लागेल’, असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले. त्यांच्या या स्पष्ट वक्तव्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या भविष्यावर आता नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.


