आई-वडिलांचे पूजन करून चिनावल येथे गुरुपौर्णिमा साजरी
कुंभारखेडा ता. रावेर. मंडे टू मंडे प्रतिनिधी |
गुरुपौर्णिमेनिमित्त नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथे आई-वडिलांचे पूजन हा छान उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. आपल्या जीवनातील प्रथम गुरु असलेल्या आई-वडिलांचे पूजन करून विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर शाळेत शिक्षण देणाऱ्या गुरुजनांचेही पूजन करून विद्यार्थ्यांनी आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन माननीय खेमचंद्र गोवर्धन पाटील होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी पालक व विद्यार्थ्यांना “मोबाईल, टीव्हीपासून दूर राहा, ज्ञान मिळवण्यासाठी वाचन करा, आई-वडिलांचे व गुरुजनांचे मार्गदर्शन घ्या” असा मोलाचा संदेश दिला. सचिव श्री गोपाळ देवचंद पाटील, सदस्य श्री मनोहर विठ्ठल पाटील, मुख्याध्यापक श्री गणेश सुभाष बाविस्कर, उपमुख्याध्यापक श्रीमती मीनल नेमाडे, उपशिक्षक, कर्मचारी व पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भावना प्रल्हाद चौधरी यांनी केले. श्रीमती सपना टोके यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. श्रीमती हर्षाली दीपक कोल्हे मॅडम यांनी गुरु-शिष्य परंपरेतील जोड्या का श्रेष्ठ ठरल्या याविषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. श्रीमती विनिता नारखेडे, श्रीमती कविता नेमाडे, श्रीमती कविता पाटील, श्री मिलिंद गारसे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आभार प्रदर्शन श्रीमती श्रद्धा नेमाडे यांनी केले.
पालक महिला श्रीमती नंदिनी प्रदीप भालेराव यांनी मनोगत व्यक्त करत शाळेच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. लहान-थोर विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्यांच्या जोड्या साकारून कार्यक्रमात रंग भरला. त्यात श्रीराम-वशिष्ठ, श्रीकृष्ण-सांदीपनी, गौतम बुद्ध-सारी पुत्र, स्वामी विवेकानंद-रामकृष्ण परमहंस, संत चांगदेव-मुक्ताबाई अशा देखण्या जोड्या व वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
कार्यक्रमात श्री कुलभूषण पाटील यांनी गुरु यांच्यावर सुंदर गीत गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी श्री योगेश बोरोले, श्री चंद्रकांत लक्ष्मण कुरकुरे, श्री तडवी तसेच श्री सरोदे श्री जुम्मा तडवी यांचे सहकार्य लाभले. आई-वडिलांचे व गुरुजनांचे पूजन करताना अनेक पालक भावुक झाले. विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता व संस्कार रुजवण्यासाठी नूतन परिवाराने घेतलेला हा उपक्रम विशेष स्तुत्य ठरला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा