भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल तालुक्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील पाडळसे आणि पिळोदा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक बिबट्या दिसल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांनी आणि शेतकऱ्यां मध्ये घबराट पसरली आहे. यापूर्वीही पाडळसा शिवारात बिबट्याचे दर्शन झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील पाडळसे आणि पिळोदा गावांच्या हद्दीजवळ असलेल्या शेतात काही शेतकरी व मजुर काम करत असताना त्यांना बिबट्या फिरताना दिसला. बिबट्याला पाहताच शेतात मोठी घबराट उडाली. वाघाने काही वेळ परिसरात वावर केल्यानंतर तो दाट झाडीत अदृश्य झाला. याशिवाय, त्याच ठिकाणी बिबट्याने एका गाईला ठार मारल्याचेही आढळून आले आहे.

शेत शिवारात बिबट्या दिसून आल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत झाले असून शेतीच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची माहिती पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी
वनविभागाकडे केली असून, वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!