भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

पाडळसा येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अंतर्गत आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

पाडळसा, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज | दि. 18 जून 2026 : – “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत BNA Construction, ग्रामीण रुग्णालय न्हावी व प्राथमिक आरोग्य केंद्र पाडलसा यांच्या संयुक्त विद्यमाने पाडलसा येथे आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले :


1.28 जून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम – 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे डोस देण्याचे महत्त्व व पालकांनी घ्यावयाची काळजी.
2.HPV (Human Papilloma virus) लसीकरण – गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी HPV लसीकरणाचे महत्त्व.
3.मान्सूनपूर्व डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना – घर व परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी नष्ट करणे तसेच डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्याबाबत मार्गदर्शन.
4.क्षयरोग (TB) – लक्षणे, निदान, उपचार व शासकीय आरोग्य सेवांद्वारे उपलब्ध सुविधांची माहिती.
5.कुष्ठरोग – रोगाची प्रारंभिक लक्षणे, गैरसमज दूर करणे व वेळेवर उपचाराचे महत्त्व.
6.HIV/AIDS जनजागृती – प्रतिबंधात्मक उपाय, तपासणी व उपचार सुविधा याविषयी माहिती.
7.नेत्र तपासणी (Eye Check-up) – डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नियमित तपासणीचे महत्त्व.
8.आयुष्मान भारत गोल्डन कार्ड व ABHA कार्ड – शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती व नोंदणी प्रक्रिया.


कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित नागरिकांच्या आरोग्यविषयक शंकांचे निरसन करण्यात आले तसेच निरोगी व आरोग्यसंपन्न गाव घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत पाडळसे येथील माजी. उपसरपंच खेमचंद्र कोळी ,प्राथमिक आरोग्य केंद्र पाडलसा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मुब्बशीर सय्यद सर, BNA construction मधील सेफ्टी ऑफिसर तुषार धनके ,आरोग्य निरीक्षक श्री. स्वप्नील भालेराव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अशफाक शेख, क्षयरोग पर्यवेक्षक श्री. नरेंद्र तायडे, ICTC समुपदेशक श्री.मनोज चव्हाण , टेक्निशियन श्रीमती. पौर्णिमा चौधरी, आरोग्य सेविका श्रीमती. ज्योती सपकाळे, आरोग्य सेवक श्री.भीमराव घोडगे,गट प्रवर्तक श्रीमती. अर्चना सोनवणे, श्रीमती.निलिमा ढाके, लिंक वर्कर श्रीमती .सुरेख इंगळे तसेच इतर सर्व आशा सेविका, मदतनीस ताई श्रीमती. मीना गुरव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.”

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!