भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावलरावेर

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका.. सावदा – फैजपूर सह रावेर, यावल तालुक्यात पनीर मिळेना… बाजारातून पनीर झाले गायब !

सावदा.ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज | महाराष्ट्र आणि इतर राज्यांत अन्न व औषध प्रशासना (FDA) कडून भेसळीविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाया मुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका घेत सावदा – फैजपूर सह रावेर,यावल तालुक्यात पनीर मिळेनासे झाले असून बाजारातून पनीर गायब झाले आहे. हॉटेल्स आणि बाजारातून पनीर अचानक गायब झाले आहे. स्वस्त आणि बनावट (सिंथेटिक) पनीर विकणाऱ्या व्यावसायिकांनी कारवाईच्या धास्तीने पनीरचे पदार्थ मेन्यूमधून काढून टाकले आहेत.

एफडीएची (FDA) कठोर मोहीमअन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. जळगाव, पुणे आणि लातूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये भेसळीच्या संशयावरून अनेक ठिकाणी पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.भेसळीची भीती आणि कारवाईची धास्तीमोठ्या प्रमाणावर बनावट किंवा कमी दर्जाचे पनीर (ज्यात स्टार्च, सिंथेटिक दूध किंवा कॉस्टिक सोडा वापरला जातो) बाजारात विकले जात होते. या कठोर कारवाईमुळे आता दुकानदारांनी व हॉटेल व्यावसायिकांनी संशयास्पद पनीर विकणे बंद केले आहे.y

‘प्रिटेंड’ किंवा ‘अॅनालॉग’ पनीरवर बंदी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) वनस्पती तेल आणि दुधाच्या सॉलिड्सपासून बनवल्या जाणाऱ्या स्वस्त आणि कमी पौष्टिक ‘अॅनालॉग’ (बनावट) पनीरच्या निर्मितीवर बंदी आणण्याची पावले उचलली आहेत. यामुळे बाजारातील बनावट पनीरची आवक थांबली आहे. या मुळेच पनीर बाजारातून अचानक गायब झाले आहे.

अस्सल पनीरचा तुटवडा
खरे पनीर तयार करण्यासाठी भरपूर दूध लागते. परंतु आधी अतिशय कमी दरात बाजारात पनीर उपलब्ध असायचे, जे भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झाले. आता खऱ्या दुधापासून बनवलेल्या अस्सल पनीरचा पुरवठा मर्यादित झाल्यामुळे बाजारात तुटवडा जाणवत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळीविरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे बाजारातील भेसळयुक्त पदार्थ आता बाजारातून कमी होण्यास सुरुवात झाली आहे. कालपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमधील मेन्यू कार्डवर ठळकपणे झळकणारे पनीरचे विविध पदार्थ अचानक अनेक ठिकाणी गायब झाल्याचे चित्र आहे. व्यावसायिकांकडून पनीरचा तुटवडा असल्याचे उत्तर दिले जात असले तरी या घडामोडीमागे केवळ पुरवठ्याची समस्या नसून भेसळीविरोधात वाढलेल्या कारवायांचा प्रभाव असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आता राज्यात बऱ्याच दुग्धजन्य पदार्थांची बारमाही विक्री करणारे स्टॉल आधीच्या तुलनेत कमी प्रमाणात दिसत आहेत. काही ठिकाणी हे पदार्थ पूर्णपणे गायब झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, इतके दिवस बाजारात उपलब्ध असलेल्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

त्यातच अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्न पदार्थां विरोधात विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर विविध भागांतून बोगस पनीर, कृत्रिम दूध आणि भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर कारवाईच्या घटना समोर आल्या आहेत. तपासणी पथकांनी अनेक ठिकाणी छापे टाकून नमुने जप्त करत प्रयोगशाळांमध्ये त्यांची तपासणी सुरू आहे. काही ठिकाणी संशयास्पद पदार्थांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे सावदा व फैजपूर परिसरासह रावेर यावल तालुक्यातील संबंधित व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी हे पदार्थ पूर्णपणे गायब झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, इतके दिवस बाजारात उपलब्ध असलेल्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तर आता तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने सर्व भेसळ करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत. मात्र या आधी पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी आता पर्यंत काय केले? असा रास्त सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!