भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

आषाढी एकादशी निमित्त कुंभारखेडा भक्तिमय…

कुंभारखेडा ता. रावेर (प्रा योगेश कोष्टी) मंडे टू मंडे न्यूज.प्रतिनिधी | हिंदू धर्मातील पवित्र समजल्या जाणाऱ्या आषाढी एकादशी सणानिमित्त कुंभारखेडा येथे भक्तिमय वातावरणात विठ्ठलाला भाविक भक्त आळवणी करत असून यावर्षी भरपूर पाऊस पडून शेतकरी राजा जनधन्यसंपन्न युक्त होऊ दे यासाठी प्रार्थना करीत आहे. यासाठी गावात संपूर्णतः भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली असून गावातील विठ्ठल मंदिर भक्तांच्या दर्शनाने गजबजून गेले आहे.


याच बरोबर नेहमीप्रमाणे न चुकता अखंड रीतीने चालू असलेल्या पंधरवड्यातील प्रत्येक दशमीला गावातील श्रीहरी भजनी मंडळ आणि श्री राम कृष्ण हरी भजनी मंडळ यांच्याकडून संपूर्ण गावात दिंडीद्वारे ग्रामप्रदीक्षणा घातली जात असून श्री अहिल्यादेवी महिला भजनी मंडळ मार्फत मंदिरामध्ये भगवंताला प्रार्थना केली जात आहे. आज आषाढी एकादशीचे अवचित्य साधून श्रीहरी भजनी मंडळ आणि श्री राम कृष्ण हरी भजनी मंडळ यांच्यामार्फत गावात दिंडी द्वारे महाप्रदक्षिणा घातलि जाऊन गावात भक्तीमय वातावरणाची निर्मिती केली जात आहे .या द्वारे लहान थोर तसेच आबाल वृद्ध लोक भक्तीमय रसात वाहून गेले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!