भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

आत्महत्या करण्यास निघालेल्या परप्रांतीय युवकास मुक्ताईनगरातील जागरूक पत्रकाराच्या दक्षतेमुळे मिळाले जीवनदान

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज चमू | एक युवक वैयक्तीक आयुष्याला कंटाळून (Suicide Try)  जीव द्यायला निघालेल्या परप्रांतीय युवकास मुक्ताईनगर येथील पत्रकार अक्षय काठोके यांच्या दक्षतेमुळे आत्महत्या करण्यास रोखण्यात यश मिळाले आहे.

याबाबत अधिकृत असे की, कामासाठी मुक्ताईनगर येथे आलेला तर मूळ पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेला विश्वजीत मोंटू उराव वय वर्षे 18 हा युवक बस स्टँड परिसरात मेन रोड वरती रात्री 10 वाजेच्या सुमारास स्थानिक मंडे टू मंडे न्यूजचे पत्रकार अक्षय काठोके व त्यांचा मित्र सुमित काचकूटे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी गाडी थांबवून विचारपूस केली असता घरगुती टेन्शनमुळे मी आत्महत्या करत आहे असे सांगितले त्यामुळे त्यांनी तात्काळ त्या युवकास गाडीवर बसवून मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले त्या ठिकाणी उपस्थित असलेले स्थानिक पोलिस अंमलदार अजय खंडेराव व पोलीस कर्मचारी दीपक ढाकरे यांनी त्या युवकाची विचारपूस करून मुक्ताईनगर शहरात त्याच्यासोबत असलेल्या त्याचे मित्र व नातेवाईकांना बोलवून त्यांच्या स्वाधीन केले.

यावेळी पत्रकार काठोके यांच्या समयसूचकतेमुळे आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यास यश आल्याने त्यांचे सर्वस्त्रातून कौतुक होत आहे.

आजची तरुणाई रागाच्या भरात अनेकदा टोकाचे पाऊल उचलताना दिसते. त्यासाठी अनेक कारणं असतात. कधी घरगुती वाद कारणीभूत असतो. तर कधी वयक्तीत आयष्यातील अडचणी अशा घटनेला कारणीभूत असतात. तर कधी आर्थिक अडचणी किंवा करिअरचे अपयशही अशी पाऊलं उचलण्यास भाग पाडतं. मात्र अशावेळी संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तरच अशा घटना टाळता येतील. काही वेळेला अशा घटना घडत असताना अनेकजण बघ्याची भूमिका घेतात. मात्र तरुणांनी समयसूचकता दाखवत या तरुणाचा जीव वाचवला. माणूसकी आणि दक्ष नागरिकाचं कर्तव्य अशा दोन्ही बाजु सांभाळत सर्वांची मनंही जिंकली भानुदास भारंबे (मुख्य संपादक- मंडे टू मंडे न्युज नेटवर्क)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!