रावेर तालुक्यात धरणाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |रावेर तालुक्यातील अभोडा येथील धरणाच्या पाण्यात पडून बुडाल्यामुळे विश्राम जिन्सी येथील गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
रावेर तालुक्यातील विश्रामजिन्सी येथील रंगलाल मांगीलाल जाधव (वय ३५) हा ११ ऑक्टोबर रोजी घरात कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेला होता. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
दरम्यान, मंगळवारी सकाळी सात वाजे च्या दरम्यान अभोडा धरणाच्या पाण्यात बुडून मयत झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत मांगीलाल चना जाधव यांनी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ईश्वर जाधव करीत आहेत.

