भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमयावल

यावल तालुक्यातील पिंपरुड येथे खुलेआम हातभट्टी व देशी दारूची अवैध विक्री

भानुदास भारंबे. मुख्य संपादक ..||
फैजपूर, ता.यावल, मंडे टू मंडे न्युज। फैजपूर येथून जवळच असलेल्या पिंपरुड या गावी पुलाजवळील इंजिन घरात देशी व गावठी हातभट्टी दारूची खुलेआम सर्रास अवैध पणे विक्री केली जात असून या कडे स्थानिक प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील पिंपरुड येथे रस्त्यावरील पुलाजवळ इंजिन घरातच देशी व गावठी दारू विकली जात असून पिंपरुड गावात सुद्धा असेच दोन ते तीन दारूचे अड्डे असून येथे सुद्धा अवैध दारू विकली जात आहे. तसेच वाढोदा रस्त्यावर देशी व गावठी दारू अवैध पणे मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. ही गावठी दारू आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याला घातक असून ही दारू पिणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामस्थ या प्रकाराला त्रासले आहेत, या पूर्वी या बाबत गावकऱ्यांकडून तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या परंतु कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

हा सर्व प्रकार सामान्य ग्रामस्थांना दिसतो मात्र पोलिसांना का दिसत नाही? पोलीस प्रशासन व दारू बंदी खात्याला या बद्दल सर्व माहिती असूनही कारवाई का होत नाही? या संदर्भात आर्थिक हितसंबंध जोपासले तर जात नाही ना? ..क्रमश..

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!