भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

बियाण्यांचा लाखो रुपये किमतीचा बेकायदेशीर साठा जप्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बेकायदेशीर असलेला ५ लाख ३४ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांचा विक्रीच्या उद्देशाने आणलेला साठा चोपडा शहर पोलिसांनी चुंचाळे येथे शेतात छापा टाकून
जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा बेकायदेशीर साठा चुंचाळे येथील नितीन नंदलाल चौधरी याने आपल्या शेतात ठेवल्याची खात्रीशीर माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली. चोपडा पोलिसांनी या माहितीच्या आधारे संबंधित शेतात छापा टाकला. यावेळी पोलिसांना गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला बियाण्यांचा मोठा साठा मिळून आला.

त्या नंतर पुढील तपासासाठी कृषी विभागाला घटनास्थळी बोलावण्यात आले. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता नऊ गोण्यांमध्ये एकूण २०२ किलो वजनाचे ४५० पाकिटे सापडले. शासनस्तरावर बंदी असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची विनापरवाना साठवणूक आणि विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून संशयित नितीन चौधरी याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!