भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव जिल्ह्यात कृषी केंद्रांवर ‘सर्जिकल स्ट्राईक, २१ केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द, २० परवाने निलंबित

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांवर विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान विविध अनियमितता आढळून आल्याने एकूण ६२ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी २१ केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून २० केंद्रांचे परवाने निलंबित तर २१ परवानाधारकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत ६२ कृषी केंद्रांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ (छापेमारी/तपासणी) करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील १६ कृषी परवानाधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल यावल तालुक्यात १५ परवान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.अनियमितता आढळल्यानंतर कृषी विभागाने संबंधित परवानाधारकांना नोटिसा बजावल्या होत्या.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देणे आणि बोगसगिरी रोखणे. या उद्देशाने ही कारवाई केली.

कृषी विभागाने जिल्हयातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. यादरम्यान नमुने (Samples) गोळा करण्यात आले आहेत. संशयास्पद बियाणे आणि खतांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, दोषी आढळून येणाऱ्या कृषी केंद्रांवर परवाना रद्द करणे किंवा फौजदारी गुन्हे दाखल करणे अशी कडक कारवाई करण्यात येणार आहे.

कृषी विभागाचा इशारा:
शेतकऱ्यांनी खते, बियाणे घेताना पक्के बिल घ्यावे आणि बोगस बियाणे विक्री आढळल्यास तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. विशेषतः कीटकनाशकांच्या फवारणीबाबत काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!