भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

crimejamaner

जळगाव जिल्हा हादरला : ४० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, १४ आरोपी जेरबंद

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज| जळगाव जिल्ह्यात ४० वर्षीय महिलेवर एक संतापजनक घटना घडली आहे. जामनेर तालुक्यामधील कापूसवाडी गावाजवळील जंगलात महिलेवर नराधमांनी सामूहिक अत्याचार करत अत्याचार करताना पीडितेचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी १४ आरोपींना अटक केली आहे.

अधिक वृत्त असे की, सदर ४० वर्षीय पीडित महिला कापूसवाडी जवळील जंगलात तिच्या ओळखीच्या काही तरुणांसोबत बसलेली होती. त्यावेळी इतर काही तरूण तेथे आले आणि त्यांनी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी या दोघांनी महिलेवर जबरदस्तीने आळीपाळीने अत्याचार केला. हा अत्याचार सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या इतर तरुणांनी पीडितेची मदत करण्याऐवजी अत्याचाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. इतकेच नव्हे, तर तो व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल देखील केला. ज्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहता जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत कठोरपणे करण्याचे आणि सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात एकूण १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन मुख्य आरोपी युसूफ तडवी आणि अशपाक तडवी यांचे सह आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!