कुऱ्हा काकोडा येथे कोविड सेंटर उभारावे– राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। कोविड १९ चा वाढता संसर्ग पाहता मुक्ताईनगर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर मध्ये संपुर्ण मुक्ताईनगर तालुक्या बरोबर बोदवड, रावेर, मलकापूर, मोताळा या तालुक्यातील पेशंट सुद्धा मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी येत आहे त्यामुळे मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर पुर्ण क्षमतेने भरले असून आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे, म्हणून जर तालुका प्रशासनाने कुऱ्हा काकोडा येथे कोविड सेंटर सुरू केले तर मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर मधील रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होऊन कुऱ्हा परिसरातील रुग्णांना फायदा होईल यासाठी कुऱ्हा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी पक्षा तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमुद केले आहे की कुऱ्हा काकोडा येथे सेंटर सुरू झाले तर कुऱ्हा, वढोदा, जोंधनखेडा, हिवरा, हलखेडा, उमरा, व पश्चिमेकडे डोलारखेडा पर्यंतच्या भागातील रुग्णांना मदत होऊन वाढता संसर्ग थांबवता येईल. कुऱ्हा येथे कोविड सेंटर उभारणीला लागणाऱ्या साधन सामुग्रीकरता आम्ही लोक सहभागातून तथा लोकवर्गणीतून मदत करण्यास सहकार्य करु. तरी लवकरात लवकर कुऱ्हा काकोडा येथे कोविड सेंटर सुरू करावे. व वाढता संसर्ग व दुर्गम भागातील पेशंटला होणारा रात्र अपरात्रीचा त्रास थांबवावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर, प्रदिप भाऊ , ह भ प विशाल महाराज खोले, माफदा अध्यक्ष रामभाऊ पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शाहिद खान,सुनिल काटे, रउफ खान, मनोज हिवरकर, दादाराव गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते