क्राईमजळगाव

अवैध धंद्यावर नाशिक विशेष महानिरीक्षकांच्या पथकाचा अमळनेरात तिसऱ्यांदा छापा,अवैध धंदे चालकाच्या गोटात खडबड

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। नाशिक विशेष पोलिस महानिरिक्षक परिक्षत्र पथकाची अवैध धंद्यावर पुन्हा छापा टाकल्याने अमळनेर पुन्हा चर्चेत आले असून स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

अमळनेर पोलिसस्टेशन हद्दीत या आधी दोन वेळा विशेष आयजी पथकाने सुरु असलेल्या अवैध धंद्यावर छापे टाकलेले आहेत. आता पुन्हा तिस-या वेळेस नऊ जानेवारी रोजी आयजी पथकाने अमळनेर शहरात चार ठिकाणी छापे टाकल्यामुळे अमळनेर पुन्हा चर्चेत आले आहे. या छाप्यात सट्टा जुगार खेळताना २८ जणांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.अटकेतील जुगा-यांकडून साडे तीन लाख रुपयांची रोकड व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बुधवारी ६ जानेवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ माजली आहे.

शहरातील अवैध धंद्यावर काही दिवसांपूर्वी आयजी पथकाकडून दोन वेळा छापे टाकण्यात आले होते. आता हा तिस-या वेळेचा छापा हा सहायक पोलिस निरिक्षक संदीप पाटील, स.पो.नि. सचिन जाधव, उमाकांत खापरे, नितीन सपकाळे, राजेंद्र सोनवणे, सुरेश टांगोरे, विश्वेश हजारे, नारायण लोहरे, केतन पाटील यांच्या पथकाने वेशभुषा बदलून सट्टा जुगारावर छापे टाकले. महात्मा गांधी शॉपिंग कॉम्प्लेक्स, सानेगुरुजी शॉपिंग कॉम्प्लेक्स, लुल्ला मार्केट तसेच गांधीनगर परिसरात टाकण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!