भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखून आदर्श आचारसंहितेचे पालन करा– सपोनि इंगोले

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा (प्रतिनिधी)। सावदा पो.स्टे. तर्फे ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर निवडणूक असलेल्या विविध गावात बैठका घेण्यात आल्या.

सावदा पोलिस स्टेशन तर्फे आगामी ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेता सावदा पो,स्टे, हद्दी मधील अनेक गावात दिनांक 0८/0१/२०२१ रोजी स,पो,नी, डी, डी, इंगोले, पोउपनि राजेंद्र पवार, सावदा पोलीस स्टेशन, यांनी सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे उदळी बु, उदळी खु, तासखेडा, गहुखेडा,रायपुर, सुदगाव इ. गावी स्टाफसह जावुन आगामी ग्रामपंचायत निवडणूक सन- २०२१ च्या अनुषंगाने बैठका घेण्यात आल्या. सदर बैठकी दरम्यान ग्रामस्थांना आदर्श आचारसंहितेचे पालन करणे तसेच वरिष्ठांकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना बाबत समजावून सांगण्यात आले असून ग्रा.प. निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था चा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या तसेच ही निवडणूक पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करणे बाबत आवाहन या वेळी पोलीस प्रशासना कडून सावदा पोलिसस्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. डी. इंगोले यांनी केले , सदर बैठकीस गावातील उमेदवार, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरीक व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!