भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

दहा हजारांची लाच घेतांना जिल्हा उदयॊग केंद्र प्रकल्प अधिकारी एलसीबीच्या जाळ्यात !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा उदयॊग केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांस PMEGP या शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळणेकामी १० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यास जळगावच्या अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

याबाबत असे की, भुसावळ येथील तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असुन त्यांनी PMEGP या शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळणेकामी तक्रारदार यांचे प्रकरण अपलोड करून सदर प्रकरण बँकेस पाठविण्याच्या मोबदल्यात आनंद विद्यागर यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. याबाबची तक्रारदार यांनी अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून प्रकल्प अधिकारी आनंद देविदास विद्यागर, (वय-५०, प्रकल्प अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय,जळगाव) यांना १० हजार रुपयाची लाच स्वीकारताना जिल्हा उद्योग केंद्र, कार्यालय जळगाव येथे रंगेहात अटक केली.

सदरील कारवाई पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे  यांच्या मार्गदर्नाखाली पो नि संजोग बच्छाव, स फौ. दिनेशसिंग पाटील, पो हे कॉ. अशोक अहीरे, पो हे कॉ. सुनिल पाटील, पो हे कॉ. रविंद्र घुगे, पो ना. मनोज जोशी, पो ना. सुनिल शिरसाठ, पो ना. जनार्धन चौधरी, पो कॉ. नासिर देशमुख, पो कॉ. ईश्वर धनगर, पो कॉ. प्रदिप पोळ, पो काॅ. महेश सोमवंशी यांनी केली .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!