Jalgaon Murder: कुसुंबा येथे दाम्पत्याचा खूनाने खळबळ !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव येथून जवळच असलेल्या अजिंठा रोड वरील कुसुंबा येथे स्वामी समर्थ शाळेच्या मागे एका दाम्पत्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की,कुसुंबा येथील स्वामी समर्थ शाळेच्या मागे राहणाऱ्या मुरलीधर राजाराम पाटील, (वय-४८) व आशाबाई मुरलीधर पाटील (वय-४०) या पती-पत्नीचा राहत्या घरात खून करण्यात आला असल्याचा प्रकार दुपारी ४ वाजता उघड झाला आहे. पत्नी-पत्नीचा गळा आवळून असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. इमारतीच्या गच्चीवर पतीला तर किचन लगत असलेल्या एका खोलीत पत्नीचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, खून कशामुळे झाला आणि कुणी केला हे अद्याप कळू शकले नसले तरी मयताच्या गळ्यावर खूण असल्याने त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. दरम्यान घटनास्थळी एमायडीसी पोलिसांनी धाव घेतली असून संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. दरम्यान, मृत दाम्पत्याच्या मुलीने मृतदेहांची ओळख पटविली असल्याचे कळते. पोलीसांची पुढील कारवाई सुरू आहे.