जळगाव मध्ये पुन्हा राजकीय भूकंप होणार ? भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात..!
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव, प्रतिनिधी: राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेनेने भाजपची सत्ता केंद्र ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू केला आहे, सतेचा फायदा घेऊन पक्ष वाढविला पाहिजे याची सूत्र सेनेला कळले असल्याचे चित्र असून पुन्हा एकदा सेनेकडून जळगाव महापालिकेतील भाजपला खिंडार पाडण्याचे संकेत मिळत असून भाजप नगरसेवक तिसर्यांदा फुटणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे जळगावच्या राजकारणात पुन्हा सेनेकडून राजकीय भूकंपाची जोरदार शक्यता आहे.
जिल्ह्यातील सेना नेतृत्वाकडून भाजपचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या जळगाव मनपात भाजपला धक्के देण्याचा चंग बांधला आल्याचे दिसत असून तिसऱ्याच वर्षी भाजपला दोन वेळा खिंडार पाडत आता पुन्हा ७ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून मागील वेळेस सेनेत प्रवेश केलेले नवग्रह मंडळाचे प्रमुख उपमहापौर कुलभूषण पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आहेत, भाजपमधील काही नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचा नवीन गट त्यांच्याच पुढाकाराने शिवसेनेत दाखल होण्यार असल्याचे समजत आहे. मुख्यमंत्र्यांनी जळगाव भाजपमधील नगरसेवकांच्या भेटीसाठी वेळ दिला असून यातच प्रवेशाचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या भाजपची गळती रोखण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येणार असले तरी त्यांच्या दौऱ्यातच नगरसेवक फुटीचा राजकीय भूकंपाचे जोरदार शक्यता आहे.
महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेने भाजपमधील नाराज असणार्या तब्बल २७ नगरसेवकांना गळाशी लावत सत्ता संपादन केली होती. हा जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे, मात्र भाजपने प्रत्युत्तर म्हणून फुटलेल्या नगरसेवकांविरूध्द अपात्रतेची कारवाई सुरू केली. यामुळे अपात्रतेच्या कारवाईतून वाचण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ३८ नगरसेवकांची आवश्यकता असल्यामुळे शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडण्याची रणनिती आखल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे . अलीकडेच भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. तर अजून काही नगरसेवक या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले होते. जिल्ह्यातील भाजपच्या डॅमेज कंट्रोलसाठी माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी काल रात्री तातडीने बैठक घेऊन नगरसेवकांनी राजकीय आत्महत्या करू नये असा इशारावजा सल्ला दिला असून या बैठकीला भाजपचे २४ नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे, मात्र आपल्या विश्वासातील वाटणाऱ्यांनीच दगाफटका केल्याने भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.