भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

जळगाव जिल्ह्यातील “या ” तहसीलदारांच्या बदल्या

जळगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क । येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यांच्या तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात जळगाव, भडगाव, मुक्ताईनगर तालुका तहसीलदारांसहा इतरही तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.जळगाव तालुका तहसीलदार नामदेव पाटील. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागाचे तहसीलदार पंकज लोखंडे यांची नंदुरबार येथे बदली झाली असून अप्पर चिटणीस उषाराणी देवगुने यांची नाशिक येथे बदली करण्यात आली आहे.

उपसचिव अजित देशमुख यांनी काढलेल्या बदल्यांच्या आदेशात तहसीलदार जितेंद्र कुवर यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे. न.पा. क्षेत्र जळगाव संभाजी पाटील यांची अक्राणी येथे बदली झाली आहे.लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे तहसीलदार विनोद भामरे यांची कल्याण येथे बदली झाली आहे. तर, जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांची राहूरी येथे बदली झाली आहे. भडगाव येथील तहसीलदार मुकेश हिवाळे यांची मालेगाव येथे बदली झाली आहे. तसेच शितल राजपूत यांची जळगाव तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तहसीलदार सुर्यकांत येवले यांची पुणे येथे बदली झाली आहे. तसेच ज्योती गुंजाळ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल विभागाच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!