जिल्हा दूध संघाचा सम्पूर्ण निकाल, कोणाला किती मतं
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसापासून गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणूकीत खडसेंना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या गटाने १६ तर खडसे गटाला ४ जागांवर विजय मिळविता आला आहे. दूध संघाच्या मावळत्या चेअरमन असलेल्या मंदाकिनी खडसे यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मुक्ताईनगर मतदार संघातून त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विजय प्राप्त केला आहे. अर्थात हा एकनाथ खडसेंचा धक्का मानला जात आहे.
जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूकीचा संपूर्ण निकाल जाहीर झाला असून मंत्री गिरीश महाजन ११८ , गुलाबराव पाटील ११३ तर संजय सावकारे हे ११० एवढ्या सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी झालेत. तर राणे मधुकर रामचंद्र सर्वात कमी अर्थात अवघ्या ४ मतांनी विजयी झाले आहेत. जाणून घेवूया…तालुका मतदार संघ निहाय कोणत्या उमेदवाराला मिळाली किती मते !
अमळनेर : अनिल भाईदास पाटील (विजयी, २४६), स्मिताताई उदय वाघ (१८४), ११ मते अवैध
भडगाव : भोसले रावसाहेब प्रकाश (विजयी २३३), पाटील डॉ.संजीव कृष्णराव (२००), ८ मते अवैध
भुसावळ : झांबरे शामल अतुल (विजयी,२६३) ,ढाके शालिनी मधुकर (१६९), ९ मते अवैध
बोदवड : पाटील रवींद्र प्रल्हादराव (२१६), राणे मधुकर रामचंद्र (विजयी, २२०), ५ मते अवैध
चाळीसगाव : पाटील प्रमोद पाडुरंग (विजयी, २४७), पाटील सुभाष नानाभाऊ (१८८), ६ मते अवैध
चोपडा : निकम रोहित दिलीप (विजयी, २६९), पाटील इंदिराताई भानुदास (१६४), ८ मते अवैध
धरणगाव : पाटील वाल्मिक विक्रम (१६७), पवार संजय मुरलीधर (विजयी २६९), ५ मते अवैध
एरंडोल : चौधरी दगडू धोंडू (विजयी,२३०), जैन भागचंद्र मोतीलाल (२०५), ६ मते अवैध
जळगाव : गुलाबराव रघुनाथ पाटील (विजयी, २७५), महाजन मालतीबाई सुपडू (१६२), ४ मते अवैध
जामनेर : महाजन गिरीश दत्तात्रय (विजयी २७६), पाटील दिनेश रघुनाथ (१५८), ७ मते अवैध
मुक्ताईनगर : चव्हाण मंगेश रमेश (विजयी२५५), खडसे मंदाकिनी एकनाथ (१७९), ७ मते अवैध
पारोळा : पाटील चिमणराव रुपचंद (विजयी, २२७), पाटील सतीश भास्कर (२०८), ६ मते अवैध
रावेर : बढे जगदीश लहू (१७०), पाटील ठकसेन भास्कर (विजयी,२६६), ५ अवैध मते
यावल : चौधरी हेमराज खुशाल (१६८), चौधरी नितीन नारायण (विजयी,२६०), १३ मते अवैध
एनटी मतदार संघ : देशमुख अरविंद भगवान (विजयी,२५९), पाटील विजय रामदास (१७९), ३ मते अवैध
एससी मतदार संघ : ब्रम्हे श्रावण सदा (१६१), सावकारे संजय वामन (विजयी, २७६), ४ मते अवैध
इतर मागास वर्ग मतदार संघ : भंगाळे गोपाळ रामकृष्ण (२०७), मोरे पराग वसंतराव (विजयी २३०), ४ मते अवैध
महिला राखीव मतदार संघ : देवकर छाया गुलाबराव (विजयी २३५), पाटील पूनम प्रशांत (विजयी २५७), पाटील सुनिता राजेंद्र (१९२), पाटील उषाबाई विश्वासराव (०),सूर्यवंशी मनीषा अनंतराव (१६४), ९ मते अवैध
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा