जळगाव पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा केला पर्दाफाश, ६४ कोटी ९० लाखांचे अँफेटामाईन ड्रग्स जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | २४ जुलै रोजी नाकीबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे ६४ कोटी ९० लाख रुपये किमतीचे अत्यंत घातक अंमली पदार्थ असलेले अँफेटामाईन ड्रग्स पोलिसांनी जप्त केले होते. अँफेटामाईन ड्रग्स वाहतूक करणाऱ्या कारचालक अब्दुल सय्यद याला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली होती. ड्रग्स वाहतूक करणाऱ्या कारचालक अब्दुल सय्यद याला एका खेपसाठी हवालामार्गे १० ते १५ लाख रुपये मिळत होते.
या प्रकरणाची तपासणी करताना पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अँफेटामाईन ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार महालिंगम नटराजन या ड्रग माफियाला पोलिसांनी तामिळनाडूमधील नागापट्टम जिल्ह्यातील विलुंदामावडी येथून अटक केली. मात्र अँफेटामाईन ड्रग्स प्रकरणातील दुसरा आरोपी महालिंगम नटराजन यांचा मुलगा योगेश महालिंगम विदेशात फरार आहे.
ड्रग्स माफिया महालिंगम नटराजन व त्याची पत्नी विलुंदामावडी येथील माजी सरपंच तर दुसरा मुलगा ॲलेक्स महालिंगम माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. ड्रग्स माफिया महालिंगम नटराजन याचे विलुंदामावडी हे गाव श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असल्याने समुद्र वाहतुकी द्वारे ड्रग्स ची तस्करी केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. देशभर या ड्रग्स तस्करीचे पाळेमुळे रोवल्या गेल्याचा पोलिसांना संशय असून पोलिस तपास करीत आहेत.

