जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, सावद्यात भरलायं गुरांचा बाजार…
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सध्या जळगाव जिल्ह्यात लम्पी स्किन (कातडी सदृश) आजाराचा प्रादुर्भाव आढळून आल्याने जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले असून २७ जुलै २०२५ पासून गुरांवर होणाऱ्या
लम्पी स्किन आजाराच्या पाश्र्वभूमीवर गुरांचे बाजार पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिनांक २२ जुलै रोजी काढले आहेत. त्या मुळे आता पुढील आदेश येई पर्यंत गुरांचे बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्या मुळे शेतकरी व गुरे व्यापाऱ्यांनी आपली गुरे विक्री साठी आणू नये असेही कळविण्यात आले होते.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला रावेर तालुक्यातील सावदा येथे केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
गुरांवरील लंम्पी आजारामुळे जिल्ह्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश असताना रावेर तालुक्यातील सावदा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सावदा च्या बाहेर रस्त्यावर गुरांचा बाजार भरविण्यात आला आहे.
रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि निरोगी पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अंतर्गत खालील आदेश जारी केले आहेत.
आंतरराज्य, आंतरजिल्हा आणि आंतरतालुका पशुधन वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले असताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर च्या कृषी उत्पन्न बाजार समिती सावदा उपविभाग च्या
बाहेर रस्त्यावर गुरांचा बाजार भरविण्यात आला असून त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता “भरलेला बाजार हा बाजार समितीच्या बाहेर असल्याने आपण कारवाई करू शकत नसल्याचे सांगण्यात आले”. मग यावर कारवाई कोण करणार?

