भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

१२५ ‘रील्स’ बहाद्दरांना जळगाव पोलिसांची नोटीस, स्टंटबाजी करणाऱ्या रील्स बाजांना दणका

जळगाव, मंडे टु मंडे न्युज |सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आक्षेपार्ह रील्स, धोकादायक स्टंटबाजी आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर आता जळगाव पोलिसांची करडी नजर आहे. अशा प्रकारच्या सोशल मीडिया कंटेंटविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष ‘सायबर पॅट्रोलिंग’ मोहीम हाती घेतली आहे. अशा १२५ रिल्स बहाद्दरांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहे.अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, आक्षेपार्ह रील्स बनवणाऱ्या आणि स्टंटबाजी करणाऱ्या एकूण १२५ तरुणांना जळगाव पोलिसांनी कायदेशीर नोटीसा बजावल्या आहेत. जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही तरुण हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणारे किंवा गुन्हेगारी वृत्तीचे उदात्तीकरण करणारे रील्स बनवत होते.

सायबर सेलच्या माध्यमातून अशा आक्षेपार्ह व्हिडिओंचा शोध घेण्यात आला आणि संबधितांना पोलीस मुख्यालयात बोलावून समज देण्यात आली. यापुढेही गुन्हेगारीचे समर्थन करणारा किंवा समाजस्वास्थ्य बिघडवणारा कंटेंट पोस्ट केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!