आरोग्यजळगाव

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जळगाव जिल्ह्यात तिसरा मृत्यू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कोरोना महामारीचे थैमान सुरूच असून जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आणखी एका कोरोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान तिसर्‍या लाटेतील कोविड बाधित मृत्यू झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भुसावळ येथील सदाशिव पाटील नगरातील एका ५३ वर्षीय इसमावर उपचार करण्यासाठी गुरुवारी रात्री दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला मधुमेह तसेच हृदयाशी संबंधित आजार असल्याने व कोरोना अधिक पसरल्याने काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आता ३ हजार ३४ रुग्ण ऍक्टिव्ह असून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आतापर्यंत दोन मृत्यू झाले आहेत. यापूर्वी ४२ वर्षीय पुरुष व ५३ वर्षीय पुरुष मृत्युमुखी पडले आहेत. तिसऱ्या लाटेतील हा आजचा तिसरा मृत्यू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!