Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

नायगावात कार्तिक स्नान, काकडा आरती सांगता सोहळा उत्साहात संपन्न

नायगाव,ता. मुक्ताईनगर. मंडे टू मंडे न्यूज.प्रतिनिधी || नायगाव ता. मुक्ताईनगर येथे श्रीराम भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्तिक स्नान सांगता सोहळ्याची भक्तिमय वातावरणात उत्साहात सांगता झाली.

कार्तिक महिन्यानिमित्त महिनाभर चाललेल्या काकडा आरती मध्ये श्रीराम भजनी मंडळ व गावाकऱ्यांनी अतिशय उत्साहाने महिना भर सकाळी चार वाजता उठून दिंडी सोहळ्यामध्ये लहान, थोर अबाल वृद्धानी माता भगिनींनी सहभाग घेतला. या धार्मिक उपक्रमाची सांगता मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविक व ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण सोहळ्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक परंपरा व गावातील एकोपा जपण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुण मित्र मंडळानी श्रीराम भजनी मंडळ, तसेच समस्त गावकर्यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!