भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळयावलरावेर

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कन्हाळे,न्हावी येथील अवैध ढाबे व गावठी दारू निर्मिती केंद्रावर कारवाई

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगांव येथील अधिक्षक श्रीमती.सीमा झावरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ येथील विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार १५-३-२२ रोजी भुसावळ तालुक्यातील कन्हाळे येथे गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर आणि यावल तालुक्यातील न्हावी येथील हॉटेल गौरव एकांत अवैध ढाब्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू,देशी दारू व बियरची अवैधपणे विक्री करतांना ८ गुन्हे नोंद करण्यात आले.

यात एकूण ४४५० लिटर कच्चे रसायन ८० लिटर गावठी दारू,१७ लिटर देशी दारू, १५ लिटर बियर,एकूण १,१८९०० रू किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा मिळून आल्याने तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे.याबाबत तपास सुरू आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, सहा.दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, वाहन चालक सागर देशमुख, नितीन पाटील, योगेश राठोड यांनी यशस्वी पणे कारवाई पार पाडली.सदरील गुन्ह्याचा पुढील तपास रा.उ.शुल्क विभाग नाशिक विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ आणि र.उ.शुल्क जळगांव विभागीय अधिक्षक श्रीमती.सीमा झावरे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली रा.उ.शुल्क विभाग विभागीय निरीक्षक सुमित कपाटे,व दुय्यम निरीक्षक राजेश सोनार हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!