भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी खु.येथील जि.प.मराठी शाळा मोजतेय अखेरच्या घटका. प्रशासनाचे दुर्लक्ष.

Monday To Monday NewsNetwork।

खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। तालुक्यातील खिर्डी खु.या गावी सन १९५७मध्ये निंभोरा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेला ६४वर्ष झाले असून सध्या स्थितीत उभी असलेली शाळेची इमारत हि खूपच जीर्ण झाली असल्याने तसेच इंग्रजी माध्यम खाजगी शाळा सुरू झाल्याने जि.प.मराठी शाळेच्या हजेरी पटावरील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असून काही वर्षा पासून ओस पडलेली शाळा अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे.

शाळेची इमारत धोकादायक झाली असून ग्राम पंचायतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनास सुमारे ४ते५वर्षापूर्वी जुन्या वापरात नसलेल्या पडाऊ वर्ग खोल्या पाडण्यात याव्या या संदर्भात मागणी अर्ज व ठराव दिलेला होता मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.तसेच जीर्ण व अर्धवट अवस्थेत पडलेल्या वर्ग खोल्यांचे खिडक्या,दरवाजे, फरशी हे अज्ञात लोकांनी चोरून नेलेले असून वर्ग खोल्या केव्हा जमिनीवर कोसळतील याचा भरवसा नाही.अंगणवाडीतील विद्यार्थी या ठिकाणी खेळण्यास येत असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने अपघाताला निमंत्रण देत आहे.सदर वर्ग खोल्या पूर्णपणे पाडून नेस्तनाबूत करण्यात याव्या अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.शाळेच्या आवारात गावातील मुले जुन्या शाळेच्या ओट्यावर खेळतांना दिसून येतात.तसेच छता वरील कौले पडत असून या पडक्या इमारतीचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर समस्या बनली आहे.मात्र या सर्व बाबीकडे जि.परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव दिसत आहे.भींतीने सुध्दा जॉइंट सोडले असून कोणत्याही क्षणी पडू शकतात.तसेच शाळेच्या मागील बाजूने राहत असलेल्या रहिवाशांच्या जीवाला सुध्दा धोका निर्माण होवू शकतो याची शास्वती नाही. लवकरात लवकर जीर्ण इमारत पाडण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांसह पालकवर्ग करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!