भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीयसामाजिक

चिमुरडीच्या संवेदनशील प्रकरणावर हसणे पडले महागात, तिघे IPS अधिकारी अखेर निलंबित, या असंवेदनशील व्हिडिओ वरून देशभरात संताप

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका अत्यंत संवेदनशील प्रकरणावर निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल मोठी आणि धडक कारवाई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी केली आहे. एका लहान मुलीशी संबंधित अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणावर प्रसारमाध्यमांना माहिती देण्यापूर्वी अत्यंत कॅज्युअल वर्तन केल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्र्यांनी ३ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हे अधिकारी पत्रकार परिषदेच्या अगदी आधी आपापसात हसताना आणि गंभीर विषयाला हलक्यात घेताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. हे प्रकरण एका चिमुरडीशी संबंधित असल्यामुळे संवेदनशीलतेचा अभाव दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निलंबनाची कुऱ्हाड चालवली.

कोयंबटूर येथे १० वर्षीय मुलीच्या अत्यंत संवेदनशील खून प्रकरणावरील पत्रकार परिषदेत हसल्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी वेस्ट झोनच्या आयजीपी  आर. व्ही. राम्या भारती (R.V. Ramya Bharathi)
एस. के. उमा (S.K. Uma) यांच्यासह तिन्ही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे.

कोईंबटूर जवळील सुलूर भागात एका १० वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपींना २४ तासांत अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या अत्यंत गंभीर विषयावर बोलताना आयजीपी र. वि. राम्या भारती आणि त्यांचे इतर सहकारी अधिकाऱ्यांनी हसल्याचा व गालातल्या गालात हसऱ्या मुद्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.


या संवेदनशील प्रकरणामध्ये पोलिसांचे हे असंवेदनशील व कॅमेऱ्यासमोर हसणे पाहून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यावर कठोर पावले उचलत मुख्यमंत्री विजय यांनी या तिन्ही आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर कठोर विभागीय कारवाईचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या या धडक आणि त्वरित निर्णयाचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत केले जात आहे. या गंभीर प्रकरणांमध्ये प्रशासनाने आणि पोलिसांनी कशी संवेदनशीलता दाखवायला हवी, याचाच हा एक कडक संदेश मानला जात

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!