‘हॉटेल रॉयल पॅलेस’ वर छापा, जुगार अड्डा उद्ध्वस्त, ८ उच्चभ्रू ना अटक,२० लाखांच्या वर रक्कम जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरातील
प्रतिष्ठित ‘हॉटेल रॉयल पॅलेस’ वर स्थानिक गुन्हे शाखेने
छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत
उच्चभ्रू व्यक्तींना पोलिसांनी अटक केली असून
१९ लाख ९७ हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि १३ मोबाईल हँडसेटसह ८ उच्चभ्रू जुगारींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
गुरूवारी १० जुलै च्या मध्यरात्रीनंतर व २१ जुलै त्या मोठ्या पहाटे हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदाना जवळील रूम नंबर २०९ मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पोउनि शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम शेख, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.हे.कॉ. प्रविण भालेराव, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.ना. किशोर पाटील आणि पो.कॉ. रविंद्र श्रावण कापडणे यांचा समावेश असलेले पथक तयार केले. दि. १० जुलै रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस गाठून खात्री केली. त्यात हॉटेलमधील रुम नंबर २०९ ही मदन लुल्ला याच्या नावावर आरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने छापा टाकला असता, तिथे ८ इसम जुगार खेळत असताना रंगेहाथ आढळून आले त्यांना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून रोख १९ लाख ९७ हजार रुपये आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे १३ मोबाईल हँडसेट असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुगार खेळणाऱ्यांमध्ये पप्पु सोहम जैन (रा. बळीराम पेठ), रुखील वय ३० वर्ष (. रा . एमआयडीसी) भावेश पंजोमल मंधान (वय-३७, रा. रामाराम नगर,सिंधी कॉलनी), मदन सुंदरदास लुल्ला (वय ४२, रा. गणपती नगर), सुनील करलाल वालेचा (वय-४०, रा. सिंधी कॉलनी), अमित राजकुमार वालेचा (वय-४५, रा. गणेश नगर), विशाल दयानंद नाथानी (वय ४८,रा. गायत्री नगर), आणि कमलेश कैलाशजी सोनी (वय-३६, रा. वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड) जळगाव या आठ जणांना करण्यात आली. त्यांच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.

