भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

मंत्रालयात नोकरीचे आमिष; बोगस वकील अन् ‘महान्याय दंडाधिकारी’ अटकेत, जळगाव भरती फसवणुकीशी धागेदोरे

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | राज्यातील बेरोजगार तरुणांना मंत्रालयात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या तपासात एमआयडीसी पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणात स्वतःला महिला व बालविकास विभागाचा कायदे विषयक सल्लागार तसेच ‘महान्याय दंडाधिकारी’ म्हणून खोटी ओळख सांगणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे गोविंद दीपक स्वार (रा. बदलापूर) आणि संदेश बी. शिरसाठ (रा. कल्याण, जि. ठाणे) अशी आहेत. प्राथमिक तपासात गोविंद स्वार हा स्वतःला मंत्रालयातील महिला व बालविकास विभागाचा कायदे विषयक सल्लागार व समिती सदस्य असल्याचे भासवत होता, तर संदेश शिरसाठ हा स्वतःला ‘महान्याय दंडाधिकारी’ असल्याचा बनाव करून लोकांचा विश्वास संपादन करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यायालयाने दोघांना सुनावली पोलिस कोठडी
दोन्ही संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली असून, सखोल चौकशी करण्यास तपास यंत्रणांना परवानगी दिली आहे.

जळगावातील भरती फसवणुकीशी संबंध
तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे जळगावातील भरती फसवणूक प्रकरणाशी जोडले गेल्याचे समोर आले आहे. सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता
संशयितांचे आर्थिक व्यवहार, मोबाईल डेटा, कागदपत्रे आणि इतर डिजिटल पुरावे पोलिसांकडून तपासले जात आहेत. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची तसेच आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!