भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

किराणा दुकाने ४ तासच खुली राहणार! राज्यात निर्बंध अधिक कडक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई वृत्तसंस्था। राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात लॉकडाऊन कडक करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.मात्र निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याचे चित्र असल्याने राज्यातील किराणा दुकानं मर्यादित वेळे पुरत्याच खुली करता येणार आहेत. सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा दुकानं सुरू राहतील असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत ऑक्सिजनच्या मागणीवरही चर्चा झाली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. याशिवाय पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!