भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळसामाजिक

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाची तालुकास्तरीय बैठक व पदाधिकारी नियुक्ती

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | येथील झुंजार लेवा समाज मंडळाच्या बी व्ही खाचणे सभागृहामध्ये लेवा पाटीदार महासंघाची भुसावळ तालुकास्तरीय बैठक नुकतीच मान्यवरांच्या उपस्थित पार पडली. सुरुवातीला आलेल्या सर्व मान्यवरांचा शब्दसुमनांनी सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष श्री. अरुण बोरोले यांनी मनोगतातून लेवा पाटीदार समाजातील चांगल्या व वाईट गोष्टीवर प्रकाश टाकला त्यासोबतच महासंघाची भूमिका व मागील २५  वर्षाचा कार्याचा लेखाजोखा युवकांनसमोर मांडत असतांना लग्नठरल्यानंतर वधू-वर आणि त्यांच्या पालकांनी कोणत्या गोष्टीचे पालन करायला पाहिजे यांवर प्रकाश टाकला.

लेवा पाटीदार मित्र मंडळ, पिंपळे सौदागर चे अध्यक्ष कृष्णाजी खडसे यांनी विवाहची आचारसंहिता याविषयात हात घालत लेवा समाजासाठी आदर्श विवाहाची आचारसंहिते करिता २७ नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. जळगाव चे माजी नगराध्यक्ष श्री बंडुदादा काळे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात ‘युवकांनी विधायक व सामाजिक कार्यात सहभाग’ या विषयावर सविस्तर माहिती दिली. माजी आमदार निळकंठ फालक यांनी लग्नातील वाद्य डी.जे. या संबंधित चांगल्या वाईट गोष्टींचे मार्गदर्शन केले.

फैजपूरचे श्री. नरेंद्र नारखेडे यांनी ‘विवाहाची आचारसंहिता अनुपालन समिती’ तयार करण्यास मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र लेवापाटीदार महासंघाने घालून दिलेल्या आदर्श आचार संहितची पालन करण्याची शपथ सर्व उपस्थितांना देण्यात आली. “सामाजिक कार्यकर्ता कसा असावा याबद्दल डॉ. प्रमोद महाजन, नाशिक यांनी युवकांची चर्चा घडऊन उत्स्फूर्त मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तालुका स्तर व गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आपले त्यामध्ये खान्देश विभाग संघटक म्हणुन श्री. विनीत पाटील (हंबर्डिकर) भुसावळ, तालुका प्रमुख महणून श्री. मंगेश पाटील भुसावळ, शहर उत्तर प्रमुख श्री. कैलास पाटील व भुसावळ शहर दक्षिण चे प्रमुख श्री. धिरज बहऱ्हाटे व इतर पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली.

नंतर कार्यक्रमाला लेवा भ्रांतृ मंडळ पुणेचे अध्यक्ष श्री. विकास वारके यांनी कृषी अॅप विषयक मार्गदर्शन केले, महासंघाचे डॉ. मिलिंद पाटील, सौ विभावरीताई इंगळे, ऍड. पुरुषोत्तम नेमाडे, ऍड. बोधराज चौधरी, भालोदचे श्री. हर्षल जावळे यांनी मार्गदर्शन केले. किन्ही चे कांतीभाई येवले, आचेगाव चे अक्षय बेंडाळे यांनी युवकांच्या समस्या मांडल्या.

गाव प्रमुख नियुक्ती मध्ये अंजनसोंडे गावप्रमुख श्री नितीन भारंबे बेलव्हाय गावप्रमुख श्री महेश खाचणे दर्यापुर गाव प्रमुख श्री गिरीष पाटील फेकरी गाव प्रमुख श्री अतुल चोपडे गोजरा गाव प्रमुख श्री हर्षल तळेले तपतकठोरा गाव प्रमुख श्री देवेंद्र पाटील साकरी गाव प्रमुख श्री संकेत वारके साकेगाव गाव प्रमुख श्री दिलीप वाघोदे सुनसगाव गाव प्रमुख श्री हर्षल पाटील तळवेल गाव प्रमुख श्री चेतन पाटील वराडसीम गाव प्रमुख श्री पराग भारंबे कंडारी गाव प्रमुख श्री युवराज महाजन निंभोरा बू गाव प्रमुख श्री किरण बोरोले यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाला तालुकाभरातून जवळपास 173 युवक उपस्थित होते. तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश पाटील सर यांनी केले व आभार श्री विनीत पाटील यांनी मानले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!