भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

ऐनपुर महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर कार्यशाळा संपन्न

ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी समिती व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या शुभ हस्ते पार पडले.

बदलत्या काळानुसार शैक्षणिक धोरणात झालेला बदल आपण अंगिकारून नवीन काळानुसार आपण स्वतः मध्ये बदल करावा असे प्रतिपादन आपल्या उद्घाटन पर भाषणात केले. या कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून डॉ एन यु बारी हे होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल का करावा लागला, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० का तयार करण्यात आली, एबीसीआयडी का करावा लागतो या विषयावर मार्गदर्शन केले.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे ध्येये, उद्दिष्टे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जे पी नेहेते यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ एस एन वैष्णव यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर, डॉ डी बी पाटील, डॉ एस बी पाटील, प्रा उमरीवाड, डॉ व्हि एन रामटेके, डॉ. पी आर गवळी, प्रा. अक्षय महाजन, प्रा प्रदीप तायडे, प्रा ऋतुजा पाटील, प्रा केतन बारी हे उपस्थित होते. श्री श्रेयस पाटील व हर्षल पाटील यांनी मेहनत घेतली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!