भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश, हॉटेलवर छापा, तीन महिलांची सुटका

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हॉटेलच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय करीत असलेल्या हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी तीन महिलांची सुटका केल्याची घटना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात उघडकीस आली.

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमधील ‘हॉटेल तारा’ येथेमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. एच सेक्टरमधील ‘हॉटेल तारा’ येथे ही धाड टाकून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलचा मालक आणि दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वृत्त असे कि, पोलिसाना एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमधील ‘हॉटेल तारा’ मध्ये देहविक्रीचा  व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवून, त्याने खोलीत गेल्यानंतर निश्चित केलेल्या सिग्नलप्रमाणे लाईट दोन वेळा बंद आणि सुरू करण्यात आले. ठरल्याप्रमाणे सिग्नल मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकत तिथून तीन महिलांची मुक्तता केली.

पीडित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यासोबत समुपदेशनाची प्रक्रिया करून हॉटेलचा मालक व ग्राहकांची चौकशी सुरू आहे. यामागे मोठे रॅकेट आहे काय? याचाही तपास पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि गृह उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकात प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, विठ्ठल फुसे, रवींद्र गायकवाड, निलिमा सुशीर, हवालदार दीपक पाटील, भूषण कोल्हे, मनीषा पाटील आणि वाहिदा तडवी यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!