मोठी बातमी : ‘उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करा’, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी येत असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी गुरूवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठलं आहे. बहुमत सिद्ध करा, या आशयाचं हे पत्र आहे. काल रात्रीच हे पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांनी हे पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागेल. बहुमत सिद्ध करण्याच्या उद्देशानं हे पत्र पाठवण्यत आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकर आता विशेष अधिवेशन लावलं जाण्याची शक्यता आहे. 39 आमदारांनी पाठिंबा काढल्यानं सरकार अल्पमतात आल्याची माहिती राज्यपालांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
महत्वाचे म्हणजे, राज्यपालांनी विधानभवना अधिवेशनात आमदार आल्यानंतर एकूण किती आमदार उपस्थितीत आहे याची शिरगणना करावी असं राज्यपालांनी सांगितलं आहे.त्यामुळे सभागृहामध्ये किती आमदार उपस्थितीत आहे. याची नोंद करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे. तसंच, उपाध्यक्षांना आवाजी मतदान घेऊ नये, सभागृह बरखास्त करू नये, अशी सूचनाही राज्यपालांनी दिली आहे. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आवाजी मतदान घेता येणार नाही. त्याचबरोबर सभागृह बरखास्त सुद्धा करता येणार नाही. एवढंच नाहीतर अधिवेशनाचे लाईव्ह ब्रॉडकॉस्ट होणार आहे.
दरम्यान, आम्ही उद्या मुंबईत जाणार आहोत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये दिली आहे. शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.