भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळात मोठी कारवाई; गांधीधाम एक्स्प्रेसमधून १२.५८ लाखांचा गांजा जप्त

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज | रेल्वे सुरक्षा दलाने ‘ऑपरेशन नारकोस’ अंतर्गत मोठी कारवाई करत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून तब्बल २५.१६७ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत १२ लाख ५८ हजार ३५० रुपये आहे. या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्या मध्यप्रदेशातून गुजरातच्या दिशेने गांजा घेऊन जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे सीमा करेलाल (२४, सोहागपूर, जि. होशंगाबाद, मध्यप्रदेश) आणि ज्योती देविसिंग मालवीया (२६, काली मंदिराजवळ, जि. होशंगाबाद, मध्यप्रदेश) अशी आहेत.

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडलात रेल्वे सुरक्षा दलाकडून अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ‘ऑपरेशन नारकोस’ राबविण्यात येत आहे. रविवारी (२३) गाडी क्रमांक २२९७४ अप पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसच्या बी-३ कोचमध्ये सीआयबी निरीक्षक सुनील कोली, प्रधान आरक्षक सुशील धर्मे, सोनल इंगळे तसेच अकोला येथील सहायक सुरक्षा निरीक्षकांचे पथक गस्त घालत होते. यावेळी दोन महिला संशयास्पद हालचाली करताना आढळून आल्या.


त्यांच्याकडील दोन ट्रॉली बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर भुसावळ स्थानकावर गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर पोहोचताच ड्युटीवरील सहायक सुरक्षा निरीक्षक दीपक तायडे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन्ही महिलांना त्यांच्या बॅगांसह खाली उतरवले. यावेळी भुसावळ स्थानकाचे निरीक्षक आणि सीआयबी निरीक्षक के. एन. राय हेही घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती मंडल सुरक्षा नियंत्रण कक्षाला देण्यात आल्यानंतर डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले. ड्युटीवरील श्वान ‘वीरू’ याने दोन्ही ट्रॉली बॅगची तपासणी केली. त्यानंतर नियमानुसार झडती घेतली असता बॅगांमध्ये गांजाची सहा बंडले आढळून आली.


वजन केल्यानंतर गांजाचे एकूण वजन २५.१६७ किलो असल्याचे निष्पन्न झाले. त्याची अंदाजे बाजारमूल्य १२ लाख ५८ हजार ३५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
जप्त केलेला गांजा आणि दोन्ही संशयित महिलांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे रेल्वेमार्गे होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!