भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

धक्कादायक : शासकीय आशादिप महिला वसतिगृहात मतिमंद महिलेला मारहाण, जळगावात खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव येथील महिला व बाल विकास आयुक्तालय संचलित शासकीय आशादिप महिला वसतिगृह गेल्या काही महिन्यांपासून अनेक कारणांनी चर्चेत आहे. असे असताना पुन्हा एकदा एका ३२ वर्षीय मतिमंद महिलेला वसतिगृहातील दुसऱ्या एका मुलीने मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. ही घटना c c tv मध्ये कैद झाली. विशेष म्हणजे ही घटना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने उघड झाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृह येथे दि.४ जुलै २०२५ रोजी सकाळी ७ ते ८ वाजे दरम्यान एका ३२ वर्षीय मतीमंद मुलीला याच वसतिगृहातील एक दोन मुलींनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत महिला पोलिस कर्मचारीने अधीक्षक यांच्यासह जिल्हा महिला बालविकास अधिकारी तडवी यांच्याकडे ही तक्रार दि. १० रोजी करण्यात आली असता त्यांनी तत्काळ यावर चौकशी समिती नेमली व सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. मात्र या वसतीगृहातील महिला अधीक्षकांनी अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कुठलीही तक्रार दिलेली नाही. आज दि.११ रोजी अधिकाऱ्यांनी या वसतीगृहाची पाहणी करून चौकशी सुरु केली असल्याचे सांगितले आहे. यावर आता चौकशी समिती नेमली गेली असून या घटनेची सखोल माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!