मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तर्फे मोफत आरोग्य तपासणी,नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तर्फे गट क्र ४३९,फैजपूर रोड, पिंपरुड फाटा येथे सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे, त्यावेळी डॉ प्रसाद पाटील बालरोग तज्ञ, डॉ भुषण जंगले जनरल फिजीशियन, आणि डॉ ललीत बोरोले दंततज्ञ व मुखरोग तज्ञ हे सेवाभावी तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत.
तर दि २७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत कांताई नेत्रालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे, तरी पंचक्रोशीतील सर्व गरजू जनतेने मोठ्या संख्येने शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री फाउंडेशन चे अध्यक्ष श्री जनार्दन जंगले यांनी केले असून डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे एक आठवड्यानंतर मिळतील असे त्यांनी सांगितले.शिबिर स्थळी मरणोत्तर देहदान फॉर्म उपलब्ध करून देण्यात येतील.