यावल तालुक्यातील अल्पवयीन तरुणीची गळफास घेत आत्महत्या
यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील
कोळन्हावी येथे १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील १७ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. घटनेनंतर तिला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपास करीत आहेत.या घटनेने कोळन्हावी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


