चौपदरीकरण कामासाठी भुसावळ- फैजपूर रस्ता १६ जुलै पर्यंत बंद, वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज | रस्त्याचे चौपदरीकरण कामासाठी भुसावळ-फैजपूर रस्ता १७ जून ते १६ जुलैपर्यंत वाहनांसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जड वाहनांसाठी फैजपूर- हंबर्डी-हिंगोणा- सांगवी-चिंतोडा- यावल-भुसावळ या मार्गाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर हलक्या वाहनांसाठी फैजपूर-हंबर्डी- भालोद-चिखली- अंजाळे-भुसावळ या मार्गाचा वापर करता येणार आहे. अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागा कडून देण्यात आलेल्या आहेत.

