भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यातील खुन प्रकरणी अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात

यावल, मंडे टु मंडे न्युज |गेल्या दि.२९ ऑगस्ट रोजी यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात खिरवा नाल्यावर इम्रान युनूस पटेल या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने रात्री खून करण्यात आला होता. याप्रकरणी २९ ऑगस्ट रोजी रात्रीच गजानन रवींद्र कोळी व ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) ही दोघे मारेकरी आरोपी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले आहेत. त्या नंतर पुढील तपासात तिसरा आरोपी यावल शहरातून तर चौथी अल्पवयीन मुलगी गोताळा येथून पोलीस पथकाने ताब्यात घेतली आहे. या खून प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची चर्चा दहिगाव परिसरात सुरू आहे.

दि२९ ऑगस्ट रोजी रात्री यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात खिरवा नाल्यावर इमरान पटेल (वय २१) याचा खून झाला होता. याच्या हत्येप्रकरणी गजानन रवींद्र कोळी व ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) हे स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले .होते. त्यानंतर तिसरा आरोपी तुषार राजेश लोखंडे यास पोलीस पथकाने यावल शहरातून अटक केली. त्यांना दि.८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याच खून प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीस नागपूर जवळील गोताळा येथून ताब्यात घेतले आहे.

या अल्पवयीन मुली कडून पोलिसांना या खून प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या खून प्रकरणात आणखी कोणी आरोपी सामील आहेत का? काय आहे हे प्रकरण? यात आणखी आरोपी असल्याची चर्चा सुरु असून या बाबत खुलासा होणार आहे.

सदरचे पथक विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर व पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचे सूत्रधार अजय कुमार वाढवे, अनिल महाजन, निलेश चौधरी, योगेश लोखंडे, सागर कोळी, राजेंद्र पाटील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!