भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षकांना झटका ! TET अनिवार्य : अन्यथा नोकरी किंवा बढती नाही, सेवेत राहायचं असेल तर…

मुंबई, मंडे टु मंडे न्युज | शिक्षकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. टीईटी परिक्षा उत्तीर्ण झाल्या शिवाय
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकविणारा कोणताही
माध्यमिक शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांना सेवा देता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

शिक्षक होण्यासाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test- TET) म्हणजेच ‘टीईटी’ उत्तीर्ण करणं अनिवार्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे . याशिवाय, टीईटी उत्तीर्ण न करता शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि ज्यांच्या सेवेला पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उरला आहे, अशा शिक्षकांना देखील आता टीईटी उत्तीर्ण करावीच लागणार आहे. अन्यथा, अशा शिक्षकांनी नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. हा निर्णय सुप्रीम कोर्टाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालात दिला आहे.या निकालामुळे समस्त शिक्षकांना मात्र धक्का बसला आहे.

या शिक्षकांच्या भावना शासन/प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक परिषदेने नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत दिला आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकविणारा कोणताही शिक्षक टीईटी परिक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय सेवेत राहू शकत नाही किंवा पदोन्नतीही मिळवू शकत नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बालशिक्षण हक्क कायदा २००९ पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक आणि पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटीतून वगळले आहे. मात्र हजारो शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. अन्यथा सदर शिक्षकांना सेवानिवृत्ती स्वीकारावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!