सावदा दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा सह० दुध उत्पादक संस्था मर्या .सावदा. ता रावेर जि जळगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि २१ सप्टेंबर रविवार रोजी संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली.यावेळी संस्थेचे सचिव दिलिप बेंडाळे यांनी विषय पत्रीका वाचून दाखविली असता सर्व विषय सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
या वेळी सर्वात जास्त दूध पुरवठा करणाऱ्यांना (दुध उत्पादकांना) बक्षीस म्हणून रोख रकमेचे वाटप संस्थेचे जेष्ठ सभासद वामन नरसो चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.तसेच संस्था प्रगतीपथावर असल्याने संचालक मंडळाने म्हशीचे दूध लिटर ९७९५५ ला प्रति लिटर ९:५० पैसे प्रमाणे जादा भाव फरक (बोनस ) व गायीचे दूध लि २३१४१० यावर प्रती लि २=६० पैसे जादा भाव फरक (बोनस) जाहीर करण्यात आला.तसेच विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
संस्थेचे सचिव दिलिप बेंडाळे यांनी सभासदांचे आभार मानून सभा संपविण्यात आली. सभेस संस्थेचे चेअरमन श्री रविंद्र बेंडाळे. व्हा. चेअरमन कुशल जावळे. संचालक संजय चौधरी, जगदिश बढे. धनंजय चौधरी भरत नेमाडे, परीक्षीत वाणी, देवानंद बढे, रविंद्र नेमाडे, किरण पाटील, माजी नगरसेवक भानुदास भारंबे व शाम पाटील यांचे सह बहुसंख्य सभासद हजर होते.

