जळगाव

आज पासून “लाडक्या बहिणीं” च्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारच्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत मे महिन्याचा मानधन निधी आज दिनांक ५ जून  पासून थेट बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत सरकारने ही योजना मोठ्या उत्साहात राबवली आहे.

माझी लाडकी बहिण’ ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून, राज्यातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळावा, यासाठी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. योजनेमुळे महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. १५०० रुपये प्रतिमहिना थेट लाभार्थींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केले जात आहेत. मे महिन्याचा हप्ता आजपासून ट्रान्सफर सुरू झाला असून हजारो महिलांच्या खात्यांत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता पर्यंत अनेकांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आजपासून सन्मान निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे पैसे थेट आधार लिंक बँक खात्यात ट्रान्सफर केले जात आहेत.” योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून सर्व अर्जांची काटेकोर छाननी करण्यात आली आहे. केवळ खऱ्या पात्र महिलांच्याच खात्यात निधी जमा केला जाणार आहे. पडताळणीअंती अपात्र ठरलेल्या अर्जदारांना या टप्प्यात लाभ मिळणार नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!