भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगावात “लव्ह जिहाद” चा प्रयत्न फसला, यावल तालुक्यातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ….. धक्कादायक प्रकार

जळगाव ,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | तरुणीला प्रपोज करुन तू जर माझा प्रपोज स्विकारला नाही तर आत्महत्या करेल अशी धमकी देऊन तिला जबरदस्तीने बुरखा घालण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने बुरखा काढण्यास सांगितले असता, तीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने पोलीस वेळीच दाखल होत त्यांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन फरहान हकीम खाटीक (वय २३) व त्याचा मित्र जमील कुरेशी (दोघ रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात राहणारी तरुणी चोपडा येथील फार्मसीचे शिक्षण घेत असून त्याच महाविद्यालयात फरहान हकीम खाटीक हा तिसऱ्या वर्षाला शिकत होता. ते दोघ कॉलेजला एकाच बसने ये-जा करीत असल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यावेळी फरहान खाटीक हा तरुणीला सोशल मीडियावरुन मॅसेज करुन तिच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करीत होता. तो तरुणीला धर्म, जात असे काही नसून प्रेम प्रेम असते असे सांगत होता. त्यानंतर काही दिवसांनी फरहान याने तरुणीला प्रपोज करुन तू जर माझा प्रपोज स्विकारला नाही तर आत्महत्या करेल अशी धमकी देखील दिली होती. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तरुण हा तरुणीसोबत सोशल मीडियावर चॅटींग करुन तीला एका धर्माबाबत व्हिडीओ टाकून तिला त्या धर्माबाबात आपुलकी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करीत होता.मात्र तरुणीने ही बाब घाबरून कोणालाही सांगितली नाही.

दरम्यान, तरुणी बुधवारी सकाळी जळगाव डीमार्ट येथे खरेदी साठी गेली असता त्यावेळी फरहान व जमील कुरेशी तीचा पाठलाग करीत तेथे पोहचले. फरहान याने सोबत आणलेला बुरखा तरुणीला जबरदस्तीने परिधान करण्यास सांगितले, बुरखा नाही घातला तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देखील त्याने दिल्यामुळे तरुणीने डीमार्टच्या चेजिंगरुमध्ये बुरखा परिधान केला. बुरखा परिधान केल्यानंतर संशयित फरहान याने माझ्यासोबत खरेदी कर असे म्हणत तरुणीला सोबत खरेदी केली. तरुणीने पैसे देण्याच्या काऊंटरवर बुरखा काढण्यास सांगितले असता, फरहान याने तू बुरखा काढला तर मी तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली. त्यावेळी आजूबाजूचे लोकांनी हे वाक्य ऐकून त्यांना संशय आल्याने मोठा जमाव जमा झाला.

जमाव जमल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. याबाबत डायल ११२ वर कॉल आल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यातील सपोनि संदीप पाटील, संदीप वाघ, सुधाकर अंभोरे, अतुल चौधरी, शरद वंजारी, सिद्धेश्वर डापकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणीसह दोघ तरुणांना त्यांनी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन  फरहान हकीम खाटीक (वय २३) व जमील कुरेशी (दोघ रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!